जावठे येथील रहदारीच्या पुलाला संरक्षक कठडे आवश्यक.

जावठे येथील रहदारीच्या पुलाला संरक्षक कठडे आवश्यक.
सुतारवाडी दि. 20 हरिश्चंद्र महाडिक 
जावठे येथील रहदारीच्या पुलाला संरक्षक कठडे असणे अत्यंत आवश्यक असून हे संरक्षक कठडे लवकरात लवकर बसवावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी जावठे गावापासून अर्धा किमी अंतरावर पूर्वीपासून चा फुल आहे या फुलाला सुरवातीला संरक्षक लोखंडी कठडे होते,  मात्र काही वर्षा नंतर ते गायब झाले. या पुलावरून सातत्याने दुचाकी, तीनचाकी,  चारचाकी गाडी जात असते येथून भाले, पहुर,  निजामपुर, इंदापूर,  माणगाव या ठिकाणी जाण्यासाठी अत्यंत सोयीचा जवळचा मार्ग आहे. येथून माणगाव पर्यंत जाण्यासाठी रस्ता सुद्धा उत्तम स्थितीमध्ये असल्यामुळे वाहतूक नेहमी चालू असते. ग्रामीण भाग असल्यामुळे रस्त्याच्या कडेला पथदिवे नाहीत,  त्यामुळे एखाद्या वाहन चालकाला पुलाची रुंदी न दिसल्यामुळे वाहन कलंडण्याची दाट शक्यता आहे. पुला पासुन थोड्या अंतरावर माध्यमिक शाळाही आहे त्यामुळे पुलावर संरक्षण कठडे असणे अत्यंत आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी सुतारवाडी, वाळंजवाडी याठिकाणी पुलावर संरक्षक कठड्याची व्यवस्था करण्यात आली. त्याच प्रमाणे जावठे येथील रहदारीच्या पुलावर संरक्षक कठड्याची व्यवस्था केल्यास येथून सातत्याने प्रवास करणाऱ्यांचा प्रश्न सुटेल. याबाबत संबंधित खात्याने लक्ष देऊन हा प्रश्न सोडवावा अशी मागणी होत आहे.